Search

Saved articles

You have not yet added any article to your bookmarks!

Browse articles

GDPR Compliance

We use cookies to ensure you get the best experience on our website. By continuing to use our site, you accept our use of cookies, Privacy Policy, and Terms of Service.

विराट कोहलीबद्दल मिचेल स्टार्कच मोठं विधान

टीम इंडिया या वर्षाच्या अखेरीस बॉर्डर-गावस्कर सीरीजसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या महत्त्वाच्या सीरीजआधी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने विराट कोहलीबद्दल मोठ वक्तव्य केलं आहे. 22 नोव्हेंबरपासून पर्थवर भारत-ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरु होईल.

टीम इंडिया या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. तिथे दोन्ही टीम्समध्ये 5 टेस्ट मॅचची बॉर्डर-गावस्कर सीरीज होणार आहे. ही टेस्ट सीरीज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 मधील भारतीय टीमची शेवटची टेस्ट सीरीज असेल. या सीरीजची सुरुवात 22 नोव्हेंबरपासून होईल. पुढच्या वर्षाच्या सुरुवातीपर्यंत ही सीरीज खेळली जाईल. ऑस्ट्रेलियाकडून आतापासूनच या सीरीजबद्दल वक्तव्य सुरु झाली आहेत. आता वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने विराट कोहलीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क विराट कोहली बरोबर जी स्पर्धा आहे, त्या बद्दल मोकळेपणाने बोललाय. विराट कोहली बरोबर जो सामना होतो, त्याचा मी आनंद घेतो असं स्टार्क म्हणाला.



“मैदानावर विराट कोहलीसोबत माझी जी स्पर्धा होते, त्याची मी मजा घेतो. आम्ही दोघही परस्पराविरुद्ध बरच क्रिकेट खेळलोय. आमच्या दोघांमध्ये काही चांगल्या लढती झाल्या आहेत. मी त्याला एक-दोन वेळा आऊट करण्यात यशस्वी ठरलोय. त्याने माझ्या विरुद्ध भरपूर धावा केल्यात, यात कुठलही दुमत नाही. त्यामुळे नेहमीच विराट सोबत चांगला सामना होतो, त्याचा आम्ही दोघे आनंद घेतो” असं मिचेल स्टार्क स्टार स्पोर्ट्सवर बोलताना म्हणाला.

Be the first to write a comment.